महाराष्ट्रात लवकरच फटाके वाजतील – नारायण राणे

महाराष्ट्रात लवकरच फटाके वाजतील – नारायण राणे

अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पाठिशी उभे राहणारे भाजप नेते-कार्यकर्ते यामुळे भाजपवर सर्वच स्तरातून टीका होत असताना आता भाजपनं देखील शिवसेनेला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेवर टीका केली आहे. बिहार निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही लवकरच फटाके वाजतील, अशा शब्दांत नारायण राणेंनी शिवसेना आणि राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘यांना काहीही जमत नसल्यामुळे महाराष्ट्रात लवकरच ती वेळ येणार आहे. राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार थांबेपर्यंत हे फटाके फुटतच राहणार आहेत’, असं देखील राणे म्हणाले आहेत.

दिवाळीच्या काळात फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच सौम्य आवाजातले फटाके वाजवायची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. यावरूनच राज्य सरकारला टार्गेट करताना नारायण राणेंनी ही टीका केली आहे. ‘राज्य सरकारनं दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचं आवाहन केलं. पण मुख्यमंत्र्यांचा या बाबतीत काहीही अभ्यास नाही. फक्त पिंजऱ्यात बसून हात धुवा, अंतर ठेवा याशिवाय मुख्यमंत्री काहीही सांगत नाहीत’, असं देखील नारायण राणे म्हणाले.

मातोश्रीवर देवाण-घेवाणीचे व्यवहार

दरम्यान, नारायण राणेंनी मातोश्रीवर देवाण-घेवाणीचे व्यवहार होतात असा देखील आरोप केला आहे. ‘राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली असताना शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. पण ठाकरे कुटुंबीयांचे बरेचसे जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत पार्टनरशिप नव्हती. पण आता मातोश्रीवर देवाण-घेवाणीचे व्यवहार होतात’, असं देखील राणे यावेळी म्हणाले.

First Published on: November 12, 2020 5:00 PM
Exit mobile version