Mumbai Cruise Drug Bust: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा ‘आर्यन खान’ची NCBकडून चौकशी

Mumbai Cruise Drug Bust: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा ‘आर्यन खान’ची NCBकडून चौकशी

Cruise Drugs Party : एनसीबीकडून आर्यन खानलसह तीन जणांना अटक

नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून करण्यात आलेल्या मोठ्या ड्रग्ज कारवाईत बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शहारुख खानचा (Shah Rukh Khan)  मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan’s son Aryan Khan) याला अटक करण्यात आली (NCB arrest Actor Shah Rukh Khan’s son Aryan Khan)आर्यनसह ८ जणांना देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एकूण दहा जणांना केलेल्या अटकेत २ महिलांचा देखील समावेश असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे. सध्या आर्यन खानसह इतरांची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या दोन महिला या दिल्लीतील बड्या उद्योगपतींच्या मुली असल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या मुंबई अधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझवर छापा टाकला. या छापेमारीत MDMA/ एक्स्टसी, कोकेन, MD (मेफेड्रोन) आणि चरस सारख्या विविध वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. २ महिलांसह ८ जणांवर अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सीआर ९४/२१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एनसीबीचे अधिकारी या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या १० जणांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत आणले. आर्यन खानची सध्या एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान आर्यनने ‘मला व्हिआयपी गेस्ट म्हणून पार्टीला बोलावण्यात आले होते. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलवण्यात आले’,  असल्याचा खुलासा केला. यासंबंघीतील वृत्त एबीपी माझाकडून देण्यात आले.

या प्रकरणी कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझचे मालक आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या कंपनीच्या मालकांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक माहिती रविवारी दुपारी एनसीबीचे मुंबई झोनल ऑफिसर समीर वानखडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – NCB Raid: मला VIP गेस्ट म्हणून बोलावलं होतं, ड्रग्ज प्रकणात अभिनेत्याच्या मुलाचा मोठा खुलासा

First Published on: October 3, 2021 11:00 AM
Exit mobile version