विदेशी नागरिकाच्या पोटात ७ कोटींचे ड्रग्ज, NCBने केला पर्दाफाश

विदेशी नागरिकाच्या पोटात ७ कोटींचे ड्रग्ज, NCBने केला पर्दाफाश

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज तस्करीची धक्कादायक पद्धत उघडकीस आणली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल, रविवारी रात्री एनसीबीने ७ कोटींचे ड्रग्ज जप्त केले असून या विदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा विदेशी नागरिक काल चक्क पोटातून ७ कोटी ड्रग्जची तस्करी करत होता. सध्या डॉक्टर त्याच्या पोटातील ड्रग्ज काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

नक्की काय घडले? 

मुंबई विमानतळावरून एक विदेश नागरिक मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊ जात आहे, अशी माहिती सुत्रांकडून एनसीबीला मिळाली होती. ही माहिती मिळताच एनसीबीच्या टीमने काल रात्री विमानतळावर पाळत ठेवली. यादरम्यान संशयाच्या आधारे एनसीबीने त्याची चौकशी केली. त्यावेळेस एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे तो देऊ शकत नव्हता. मग तपासदरम्यान विदेशी नागरिकाने ड्रग्ज गिळले आहेत, असे आढळून आले.

एनसीबीच्या सुत्रानुसार या विदेशी नागरिक सुमारे ७ कोटी रुपयांचे ड्रग्स पोटात भरून जाण्याच्या तयारीत होता. त्याचवेळेस मुंबईतील विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. विमानतळावर बॉडी स्कॅनमध्ये त्याच्या पोटात संशयास्पद कॅप्सूल आढळून आले. मग त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याच्या पोटात असलेल्या ड्रग्सने भरलेल्या कॅप्सूल काढण्याचे शर्थीच प्रयत्न सुरू आहेत. हे ड्रग्स ७ कोटी रुपये किमतीचे असल्याचे समोर येत आहे. मात्र अद्याप विदेशी नागरिक ड्रग्स कुठून कुठे घेऊन जात होता? हे समजले नाही आहे. सध्या एनसीबी याचा तपास करत आहे.


हेही वाचा – मुंबईत NCB ची मोठी कारावाई, २ ड्रग पेडलर्ससह ५० लाखांचे ड्रग्स जप्त, दोन अधिकारी जखमी


First Published on: August 9, 2021 11:22 AM
Exit mobile version