मन्नत बंगल्यावर एनसीबी टीम का पोहचली ? समीर वानखेडेंनी सांगितले कारण

मन्नत बंगल्यावर एनसीबी टीम का पोहचली ? समीर वानखेडेंनी सांगितले कारण

मन्नत बंगल्यावर एनसीबी टीम का पोहचली ? समीर वानखेडेंनी सांगितले कारण

ड्रग्ज क्रूझ प्रकरणी आर्यन खान (Aryan Khan) सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गुरुवारी सकाळीच शाहरुख खान (Shahrukh KHan)  आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये भेटण्यासाठी गेल्या होता.  त्यानंतर तासाभरातच नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (NCB)  टीम शाहरुखच्या वांद्रे येथील मन्नत (mannat bunglow)  या निवासस्थानी दाखल झाली. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानच्या घरी छापेमारी केली असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र यावर एनसीबीचे मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी यावर स्पष्टीकरण देत मन्नत वर एनसीबीची टीम कोणतीही छापेमारी करण्यासाठी गेली नसून आर्यन खानच्या चौकशीचा एक भाग होता. आर्यन खान ड्रग्ज केससंबंधीत काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यासाठी एनसीबीची टीम मन्नत बंगल्यावर गेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानच्या घरी एनसीबीने एक नोटीस जारी करत आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रिक डिव्हाइज असल्यास ते एनसीबीकडे सुपूर्त करावे असे सांगण्यात आले आहे. एनसीबीचे अधिकारी वीवी सिंह हे शाहरुखच्या घरी गेले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पेपर वर्क बाकी होते ते करण्यासाठी एनसीबीची टिम मन्नतवर गेली असल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीबीची टिम मन्नतवर दाखल झाली तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिला देखील एनसीबीने समन्स बजावले. दुपारी दोन वाजता अन्यन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश देण्यात आले आहे. ड्रग्ज संदर्भात काही व्हॉट्स अँप चॅट्स एनसीबीच्या हाती लागल्याने तिला समन्स बजावण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच एनसीबी पथकाने मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारीचे सत्र सुरू केले आहे.


हेही वाचा – ‘वानखेडेंच्या परिवारातील सदस्यांनी फिल्म इंडस्ट्रीकडून दुबई, मालदीवला जाऊन वसुली केली’

First Published on: October 21, 2021 3:42 PM
Exit mobile version