राज्यात 1 हजार 444 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; आठ जणांचा मृत्यू

राज्यात 1 हजार 444 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; आठ जणांचा मृत्यू

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आरखड्यात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहेत. आज राज्यात 1 हजार 444 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, दिवसभरात एकूण 2 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आठ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. (New corona patients in maharashtra and 8 patients dead)

राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79 लाख 39 हजार 594 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.03 टक्के इतके झाले आहे. राज्यात एकूण 10 हजार 902 सक्रिय रुग्ण संख्या आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4 हजार 412 इतके रुग्ण आहेत. मुंबईनंतर ठाण्यामध्ये 2 हजार 478 सक्रिय रुग्ण आहेत.

देशभरात गेल्या 24 तासांत 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 22 हजार 31 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 38 लाख 25 हजार 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्येत 2 हजार 152 रुग्णांची घट झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 7 हजार 591 नवीन कोरोनाबाधित आढळले होते. देशातील कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही घट झाली आहे. सध्या देशात 65 हजार 732 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. यामधील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणं असणारे आहेत.

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण जालीम उपाय मानला जातो. त्यामुळे राज्यभरात लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. तसेच, सध्या ज्या नागरिकांच्या लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत. त्यांना बुस्टर डोस दिला जात आहे.

दरम्यान, एकिकडे कोरोनाचे संकट असून, दुसरीकडे साथीच्या आजरांनी डोकं वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.


हेही वाचा – कांजूर कारशेडप्रकरणावर अखेर पडदा, ठाकरे सरकारचा आदेश शिंदे सरकारकडून मागे

First Published on: August 30, 2022 7:30 PM
Exit mobile version