पश्चिम रेल्वेचा भंगार विक्रीचा नवा विक्रम

पश्चिम रेल्वेचा भंगार विक्रीचा नवा विक्रम

Indian Railway : दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडने टक्कर; रेल्वेमंत्री स्वत: असणार रेल्वेत; नेमकं होणार काय?

भंगारमुक्त रेल्वे करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून शून्य भंगार मोहीम राबविण्यात येत आहे. यामोहिमेतंर्गत २०१९-२० मध्ये ५३३ कोटी ३७ लाख रुपयांचे भंगार विक्री केली आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या महाव्यस्थापक आलोक कंसल यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात सुरु असलेल्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेने २३० कोटी ३१ लाख रुपयांचे भंगार विकले आहे. भारतीय रेल्वेच्या सर्व रेल्वे विभागांपेक्षा पश्चिम रेल्वेने यंदा सर्वाधिक भंगार विक्री करुन एक नवी विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे.

२३० कोटी ३१ लाख रुपयांचा नफा

पश्चिम रेल्वे नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. या शून्य भंगार उपक्रमांतर्गतच रेल्वे मार्गावरील लोखडी ट्रॅक, कोच, वॅगन, लोकोमोटिव आणि रेल्वे पुलाच्या देखभाल करते वेळी मोठ्या प्रमाणावर भंगार निघत असते. शून्य भंगार मोहिमतंर्गत निघालेल्या भंगाराची अवघ्या दोन महिन्याअंतरावर रेल्वेकडून विक्री केली जाते. पश्चिम रेल्वेने आपल्या रेल्वे कार्यशाळेतील ९७ टक्के, रेल्वे स्थानक, विभागात आणि डिपोमध्ये ६५ टक्के भंगारमुक्त करण्यात यश्वस्वी ठरली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी सांगितले की, या मोहिमेतंर्गत आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या शेवटी रेल्वे कर्मचार्‍यांच्या जुन्या रेल्वे वसाहती, सर्विस बिल्डिंग, पाण्याच्या टाक्या हटविण्यात येणार आहेत. यातून निघाणार्‍या भंगाराची विक्री ई-ऑक्शनच्या माध्यातून करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ४ हजार अशा संरचना ७ कोटी रुपयांत व्रिकी करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम रेल्वेच्या सामुग्री प्रंबधन विभागाने शून्य भंगार मोहिमेअंतर्गत हा विक्रम केलेला आहे. परेच्या विभागातील भंगार शोधून ते विकण्यासाठी अभियान राबविले होते. त्यासाठी एका उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली होती.

First Published on: December 10, 2020 7:59 PM
Exit mobile version