शोभायात्रा ,बाईक रॅलीस बंदी!

शोभायात्रा ,बाईक रॅलीस बंदी!

गुढीपाडवा

गुढीपाडव्याच्या सणानिमित्ताने राज्य सरकारने नवी नियमावली जारी केलीय. या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आलीय. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठमोळा सण असलेला गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे शासन आदेशानुसार सूचित करण्यात आले आहे. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो.

या आहेत गाईडलाईन्स
१) पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यास बंदी
२) सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनास बंदी
३) सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई
४) घरगुती गुढी उभारून साधेपणाने सण साजरा करावा
५) आरोग्य, रक्तदान शिबिरे घेण्यास स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक

First Published on: April 13, 2021 4:30 AM
Exit mobile version