‘तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही’; निलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

‘तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही’; निलेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर न घेता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर चौफेर टीका केली. गेल्या काही काळापासून राज्यात विरोधकांनी आपल्या टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री असे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत.

तर एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात जातात. बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला अशी कविता होती. पण या बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला. या लोकांचा थोडाफार समाचार घेणे गरजेचे आहे. अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणे पितापुत्रांवर केली. त्यानंतर नारायण राणेंचे दोन्ही पुत्र चांगलेच खवळले असून माजी खासदार राहिलेल्या निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य, पण बिहारवर २० मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, असं ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केला प्रहार

यापूर्वी नितेश राणेंनीही ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता. दुसऱ्यांची पिल्लं वाईट…मग त्यांनी काय DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का? अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन द्या.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” अशी टीका नितेश राणे यांनी अधिकृत ट्विटरवरुन केली.

“बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी “Vaccine” घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज, किती आव, ‘टाचणी’ तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन द्या,” अशी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केली.


Shiv Sena Dussehra Rally: ‘आम्हाला भाडोत्री बाप नको’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

First Published on: October 26, 2020 9:13 AM
Exit mobile version