मुंबईतील बीकेसीत कलाप्रेमींसाठी NMACC ची स्थापना; आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र

मुंबईतील बीकेसीत कलाप्रेमींसाठी NMACC ची स्थापना; आंतरराष्ट्रीय दर्जाचे सांस्कृतिक केंद्र

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र अर्थात NMACC उभारण्यात आले आहे. रिलायन्स उद्योग समुहातर्फे सांस्कृतिक केंद्र उभारण्यात आले आहे. भारतीय आणि जागतिक कलेच्या प्रदर्शनासाठी ही इमारत उभारण्यात आली आहे. एकूण चार मजल्याची ही उभारण्यात आली असून, भारतीय कलेचं संवर्धन या केंद्रातून होणार आहे. विशेष म्हणजे कलाप्रेमींचा उत्साह वाढवण्यास मदत होणार आहे. (nita mukesh ambani cultural centre in bandra kurla complex mumbai)

जिओ वर्ल्ड सेंटरमधील फाउंटन ऑफ जॉयच्या शेजारी ही चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. ही जागा भारतीय कलेचा खजिना प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. भारताकडे जगाने व्यापक सांस्कृतिक दृष्टीकोनातून पाहाण्याचा मानस आहे.

या चार मजली सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीत आर्ट हाऊस, द ग्रँड थिएटर, द क्यूब, द स्टुडिओ थिएटर उभारण्यात आले आहेत. या सांस्कृतिक केंद्राबाबत रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या की, “भारतीय कलांचे जतन आणि संवर्धन करण्याची आमची वचनबद्धता आहे. मला आशा आहे की ही जागा प्रतिभेची जोपासना करेल आणि विविध प्रतिभांना प्रेरणा देईल, भारत आणि जगभरातील लोकांना एकत्र आणेल”.

आर्ट हाऊस

द ग्रँड थिएटर

द क्यूब

द स्टुडिओ थिएटर


हेही वाचा – अलर्ट! आता मुंबईतही कोरोना वाढला, दोन दिवसांत आढळले ‘एवढे’ रुग्ण

First Published on: March 29, 2023 10:01 PM
Exit mobile version