नितेश राणेंचा लव्ह जिहादविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’; जितेंद्र आव्हाडांना म्हणाले, ‘मुंब्र्याचे जितोद्दीन…’

नितेश राणेंचा लव्ह जिहादविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’; जितेंद्र आव्हाडांना म्हणाले,  ‘मुंब्र्याचे  जितोद्दीन…’

Jalna the government will take action Nitesh Ranes testimony in the lathicharge case against the Maratha community

लव्ह जिहाद वरून राज्यात सध्या वातावरण तापलेले असताना समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि आमदार नितेश राणे यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या आवारात खडाजंगी पहायला मिळाली होती. तेव्हापासून या दोघांत बराच वेळ तु…तु…मै…मै काही थांबण्याचं नाव घेत नाही. लव्ह जिहादच्या मुद्दा आणखी लावून धरत भाजपा आमदार नितेश राणे यांनी याविरोधात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा फॉर्म्यूला वापरून अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र सोडलंय.

यावेळी आमदार नितेश राणेंनी लव्ह जिहादचा एक व्हिडीओ दाखवून अबू आझमींवर हल्लाबोल केलाय. या व्हिडीओमध्ये मुस्लिम समाजाच्या महिलाच धर्मांतराबाबत बोलताना दिसत आहेत. लव्ह जिहादची प्रकरण खोटी असल्याचं सांगत लव्ह जिहाद होतंच नाही असं सांगणाऱ्या अबू आझमींनी हे व्हिडीओ पहायला हवेत, असा टोला देखील त्यांनी लगावला. तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना त्यांचा ‘मुंब्याचे जितोद्दीन’ असा उल्लेख केलाय. त्यांनी सुद्धा हा व्हिडीओ एकदा पाहावा, असं देखील नितेश राणे म्हणाले.

या मुद्द्यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की, हिंदू मुलींचे आयुष्य बरबाद होत आहेत. जर तरूणाला हिंदु मुलींशी लग्न करायचं असेल तर त्यासाठी धर्मांतराची काय गरज आहे? तिने हिंदू देवी-देवतांची प्रार्थना बंद करण्याची जबरदस्ती करण्याची काय गरज आहे? असा सवाल देखील यावेळी नितेश राणेंनी उपस्थित केलाय. जर प्रेम असेल तर हिंदू म्हणून प्रेम करावं. पण तसं न करता जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रकार यालाच लव्ह जिहाद म्हणतात. लग्न कोणीही कुणाबरोबर करा. त्यावर आमचा आक्षेप नाही. पण लग्नानंतर धर्म बदलला जातो. मुलीने कुराण वाचावे. हिंदू देव देवतांचे फोटो ठेवू नयेत, असा तिच्यावर दबाव टाकला जातो. यावर आमचा आक्षेप आहे, असं देखील नितेश राणे म्हणाले.

तसंच या प्रकरणात योग्य पुरावे कोर्टात दाखल करण्यात आलं असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं. लव्ह जिहाद करणाऱ्यांना घाबरवलं जातं, मग पोलीस स्टेशनमध्ये कक्रार तरी कशा नोंदवल्या जाणार आणि मग लव्ह जिहादचे कोणतेच प्रकार घडले नाहीत, असं सांगायचं, हा प्रकार सुरू असल्याचं देखील नितेश राणेंनी सांगितलं.

यावेळी नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाढांवरही निशाणा साधला. “तुम्ही आमदार नंतर आहात, पण पहिले तुम्ही एका मुलीचे वडील आहात…एका हिंदु मुलीचे वडील आहात. तुम्ही बोलण्याच्या आधी विचार करायला हवा. राज्यातील असंख्य मुलींचं आयुष्य लव्ग जिहादमुळे खराब होत आहे. हे कुणासोबतही घडू शकतं. जितेंद्र आव्हाढ आणि अबू आझमींनी केलेल्या वक्तव्यामुळे असंख्य जिहादी विचारांच्या लोकांना समर्थन मिळत असल्याचा आरोप देखील यावेळी नितेश राणेंनी केलाय.

First Published on: March 21, 2023 12:37 PM
Exit mobile version