आता डीजेचा आवाज बंद – हायकोर्टाचा निर्णय

आता डीजेचा आवाज बंद – हायकोर्टाचा निर्णय

Representative image

गणेशोत्सवात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भक्त डीजे आणि डॉल्बीच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देतात. मात्र यंदा डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टमवर बंदी घालत मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. दरवर्षी सण येत – जात असतात, पण या उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करु शकत नाही, असे हायकोर्टाने सुनावत डीजेचा आवाज बंद करुन टाकला आहे. डीजे आणि डॉल्बीला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्य असल्याची भूमिका राज्य सरकारने हायकोर्टात मांडली असून याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून हायकोर्टाने आता डीजे आणि डॉल्बीला बंदी घातली आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जनात डीजे, डॉल्बीचा गोंगाट सहन करावा लागणार नसून त्या जागी पारंपारिक वाद्यांचा समावेश होणार आहे.

डीजे, डॉल्बीला बंदी

मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि डॉल्बीचा गोंगाट होतो. हा गोंगाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी नाकारली आहे. याविरोधात प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड लाइटनिंग असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली आहे. या सुनावणी दरम्यान सरकारने डीजेला परवानगी देण्यास कडाडून विरोध केला आहे.

फटाके वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

डीजे आणि डॉल्बीचा गोंगाटावर प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड लाइटनिंग असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी युक्तीवादा दरम्याम हायकोर्टात सांगितले आहे की, पोलिसांनी डॉल्बी आणि डीजेला परवानगी नाकारण्यापूर्वी कोणताही अभ्यास केलेला नाही. तर यापूर्वी फटाके वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत का असा सवाल उपस्थित केला आहे. तर लाइव्ह कॉन्सर्ट आणि इनडोअर कार्यक्रमांमध्ये डीजे आणि डॉल्बीला परवानगी दिली जाते. मग सार्वजनिक ठिकाणीच बंदी का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाचा – डीजे बंदीवर तोडगा काढा; डीजे मालकांचे राज ठाकरेंना साकडे

 

First Published on: September 19, 2018 2:09 PM
Exit mobile version