घरमुंबईडीजे बंदीवर तोडगा काढा; डीजे मालकांचे राज ठाकरेंना साकडे

डीजे बंदीवर तोडगा काढा; डीजे मालकांचे राज ठाकरेंना साकडे

Subscribe

डीजेवर बंदी आणण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे, त्यामुळे डीजे मालकांची मोठी पंचाईत झाली आहे.

डीजेवर बंदी आणण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे, त्यामुळे डीजे मालकांची मोठी पंचाईत झाली आहे. या निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने डीजे मालकांनी सोमवारी थेट ‘कृष्णकुंज’ गाठले आणि डीजे बंदीवर काहीतरी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घातले. यावेळी मुंबई, ठाणे आणि नाशिक भागातून मोठ्या संख्येने डीजे ऑपरेटर्स आले होते. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बी साउंड सिस्टिम वाजवण्यावर मुंबई हायकोर्टाने बंदी घातली आहे.

दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात निघणार्‍या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर डीजे साउंड सिस्टिमचा वापर केला जातो. डीजे साउंड सिस्टिमच्या वापराबद्दल काही मंडळे ठाम असून यावरुन काही भागात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणे कितपत योग्य आहे? असा सवाल डीजे मालक करत आहेत. दरम्यान डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टिममुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होते. सण येत जात राहतात, पण उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही, असे सांगत हायकोर्टाने डीजेवर बंदी घातली. याबाबत 19 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -