मुंबई पोलिसांचे पगार आता HDFC बँकेत; पोलिसांना मिळणार १ कोटींपर्यंत विमा कवच

मुंबई पोलिसांचे पगार आता HDFC बँकेत; पोलिसांना मिळणार १ कोटींपर्यंत विमा कवच

मुंबई पोलिसांचे आणि मंत्रालीयन कर्मचाऱ्यांचे पगार आता HDFC बँकेत होणार असल्याची माहिती मिळतेय. फडणवीस मुख्यमंत्री असताना 2015 साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपल्याने नवीन बँकेचे प्रस्ताव आले होते. अ‍ॅक्सिस बँकेबरोबरचा करार संपल्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते. HDFC ने दिलेल्या प्रस्तावात पोलिसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांना मिळणार १ कोटींपर्यंत विमा कवच

HDFC बँकेकडून मुंबई पोलिसांना उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास 10 लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्‍यांना HDFC बँक देणार आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून पोलीस दिवसभर काम करत आहेत. पण पोलीस हे आपले रक्षक असले तरी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलिसांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे पोलिसांना अशा प्रकारे मदत मिळणं म्हणजे आनंदाची बाब आहे.


Covid-19: ब्राझीलमध्ये ऑक्सफोर्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू; तरीही चाचणी सुरू

First Published on: October 22, 2020 9:15 AM
Exit mobile version