घरदेश-विदेशCovid-19: ब्राझीलमध्ये ऑक्सफोर्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू; तरीही चाचणी सुरू

Covid-19: ब्राझीलमध्ये ऑक्सफोर्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू; तरीही चाचणी सुरू

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात जवळपास १२ लसींची चाचणी अंतिम टप्प्यात

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात जवळपास १२ लस अशा आहेत ज्यांची चाचणी अंतिम टप्प्यात आहेत. या चाचण्यांमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि AstraZeneca ची कोरोना लस सर्वात चांगली असल्याचे म्हटले जाते. मात्र यासंदर्भात, एक वाईट बातमी अशी आहे की या लसीच्या चाचणी दरम्यान ब्राझीलमध्ये एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय.

ब्राझीलच्या आरोग्य प्राधिकरण Anvisa यांनी बुधवारी सांगितले की, लस चाचणीत एक स्वयंसेवक सहभागी होता, आणि त्याचा मृत्यूही झाला. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण ही लस नसल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतरही ब्राझीलने यापुढे चाचण्या थांबविल्या जाणार नाहीत, असा निर्णय घेतला.

- Advertisement -

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाओलोच्या मदतीने ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरस लस AZD222 चा तिसरा टप्पा सुरू आहे. मृत्यू झालेला स्वयंसेवक ब्राझीलचा असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, ही व्यक्ती २८ वर्षांची आहे असून त्याला संपूर्ण लस दिली नव्हती. Anvisa ने सांगितले की, या घटनेनंतरही या लसीची चाचणी सुरूच राहिल, परंतु त्याविषयी फारशी माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे, ऑक्सफोर्डच्या शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की लसच्या सुरक्षिततेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. यापूर्वी सप्टेंबरमध्ये ब्रिटनमधील लसीच्या चाचणी दरम्यान एका स्वयंसेवकाला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दुसरीकडे दक्षिण कोरियामध्ये फ्लू लागल्यानंतर ५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी देखील आहे.

- Advertisement -

अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेतही आता एफडीएने (अन्न व औषध प्रशासन) सुरक्षिततेच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर चाचणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण आता पुन्हा एकदा ब्राझीलच्या घटनेनंतर काय निर्णय होईल असा प्रश्न आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणूच्या संसर्गाबद्दल सर्वोच्च ब्रिटीश वैज्ञानिक सल्लागाराच्या दाव्यामुळे लोकांची चिंता अधिक वाढली आहे.

कोरोना महामारीसाठी स्थापन झालेल्या ब्रिटीश सरकारच्या सल्लागार समितीमधील एका वैज्ञानिकांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा कधीही नाश होणार नाही. तो लोकांमध्ये कायम राहील. तसेच ही लस निश्चितपणे सध्याची परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास फायदेशीर ठरेल.


Good News: लवकरच येणार कोरोनाची लस; डिसेंबरपर्यंत Moderna लसीला मिळणार मंजूरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -