आता डोंबिवलीत प्लास्टिकचे रस्ते

आता डोंबिवलीत प्लास्टिकचे रस्ते

आता डोंबिवलीत प्लास्टिकचे रस्ते

केडीएमसीने प्लास्टिकमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे डोंबिवलीत टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ रस्ते तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. सर्वाधिक रहदारीचा असलेला एमआयडीसीतील डीएनएस बँक ते आईस फॅक्टरीपर्यंतच्या मार्गावर प्लॅस्टिकमिश्रित डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यास केडीएमसी संपूर्ण पालिका कार्यक्षेत्रातील रस्ते प्लॅटिकमिश्रित केले जाणार आहे. केडीएमसीचा हा पहिला प्रयोग असून पालिकेने १५० मीटर लांबीच्या रस्त्याची निवड केली.

या प्लास्टिकच्या रस्त्यासाठी डांबराचा देखील वापर केला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करून त्याचे २.६ मिमीपर्यंत बारीक तुकडे करून हे तुकडे डांबराबरोबर १०६ अंश सेल्सियसला तापवले जातात. त्यानंतर प्लॅस्टिकचे तुकडे डांबरात व्यवस्थित मिसळले जातात. हे प्लास्टिकमिश्रित डांबराचा थर खडीला चिकटतो. त्यामुळे रस्त्यावर खडीचा थर चिटकून राहतो. हा प्रकल्प रस्त्याचे आयुष्य वाढवणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

यापूर्वी बंगळुरू, तामीळनाडू, ठाणे, पुणे शहरात अशाप्रकारचा प्रयोग केला आहे. केडीएमसीने हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर केला आहे.


हेही वाचा – थंडीचा कडाका वाढला; मुंबई बनले हिल स्टेशन


 

First Published on: January 16, 2020 11:42 AM
Exit mobile version