Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली! आज 1,857 नवे रुग्ण तर 11 रुग्णांचा मृत्यू

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली! आज 1,857 नवे रुग्ण तर 11 रुग्णांचा मृत्यू

India Corona Update : देशभरात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत 13 टक्क्यांनी घट ; मृत्यू दरात वाढ

मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. 21 जानेवारी रोजी 5000 हजारांचा आकडा गाठणारी रुग्णसंख्या आज जवळपास 1800 वर पोहचली आहे. यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे म्हणता येईल. मुंबईत गेल्या 24 तासात 1857 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आज 503 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.


मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या नव्या रुग्णांपैकी 234 रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील 53 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. दरम्यान आज नोंदवलेल्या 1560 रुग्णांना कोणताही लक्षणे नाहीत. तर 37 हजार 742 बेड्सपैकी केवळ 3,855 बेड्स आता भरलेले आहेत. मुंबईचा कोरोना रिकव्हरी रेट हा 96 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत आजही शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 27 सक्रीय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत आज एकूण 34 हजार 301 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर एकूण चाचण्यांची संख्या ही 150,11,519 इतकी झाली आहे.

मुंबईत आत्तापर्यंत 1,036,690 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 96 हजार 289 इतकी झाली आहे. याशिवाय 16 हजार 546 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जानेवारी ते 23 जानेवारी 2022 पर्यंत मुंबईतील एक कोरोना वाढीचा दर हा 0.47 टक्के झाला आहे. मुंबईत आजही शून्य कंटेनमेंट झोन आहेत. तर 29 सक्रीय सीलबंद इमारती आहेत.


Omicron : देशात ओमिक्रॉन संसर्गाचा वेग केव्हा थांबणार?

First Published on: January 24, 2022 8:41 PM
Exit mobile version