घरCORONA UPDATEOmicron : देशात ओमिक्रॉन संसर्गाचा वेग केव्हा थांबणार?

Omicron : देशात ओमिक्रॉन संसर्गाचा वेग केव्हा थांबणार?

Subscribe

गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 306064 नवे रुग्ण नोंदवण्यात आले.

देशभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र 15 फेब्रुवारीपासून ही कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ शकते. यामागचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेले कोरोनाविरोधी लसीकरण. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लसीकरणामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मोठी मदत झाली. यामुळे कोरोनाची तिसरी लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्राणघातक ठरली. एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयांमध्येही मोठ्या संख्येने रुग्ण अॅडमिट झाले होते, आरोग्य सेवांवर याचा वाईट परिणाम दिसून आला. मात्र सध्याच्या लाटेत चित्र पूर्णुपणे बदलेले आहे.

- Advertisement -

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारीपासून देशात कोरोना संसर्ग कमी होऊ लागला आहे. काही राज्ये आणि मेट्रो शहरांमध्येही कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होत आहे. यामुळे परिस्थिती स्थिर होत आहे. कोरोनाविरोधी लसीकरणामुळे देशात तिसऱ्या लाटेचा फारसा परिणाम जाणवला नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून काम करत असल्याने हे शक्य झाले आहे. देशात आत्तापर्यंत 74 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 306064 नवे रुग्ण नोंदवण्यात आले, मात्र हा आकडा गेल्या चार दिवसांच्या आकडेवारीपेक्षा 8 टक्क्यांनी कमी आहे. त्याचवेळी या कालावधीत देशभरात कोरोनामुळे 439 मृत्यू झाले. हा आकडा 5 दिवसातील सर्वात कमी आकडा आहे. सध्या देशात कर्नाटकात सर्वाधिक 357826 सक्रिय रुग्ण आहेत. त्याचवेळी महाराष्ट्र 297115 रुग्णसंख्येसह दुसऱ्या क्रमांकावर आणि
केरळ 265349 तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी आतापर्यंत देशभरात कोरोना लसीकरणाचे 162 कोटी डोस देण्यात आले आहेत.


नागपुरातील शाळा २६ जानेवारीनंतर सुरू करण्याचा निर्णय, पालकमंत्री नितीन राऊतांची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -