Corona : जेईई परीक्षेच्या ऑनलाईन अर्जासाठी मुदत वाढ

Corona : जेईई परीक्षेच्या ऑनलाईन अर्जासाठी मुदत वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) जेईई (मुख्य) 2020 परीक्षेच्या ऑनलाईन अर्जामध्ये परीक्षा केंद्राचे शहर निवडीच्या दुरुस्तीला मुदतवाढ देण्याची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांनी दिल्या आहेत. जेईई (मुख्य) 2020 साठी ऑनलाईन अर्जातील दुरुस्ती सुविधेसंदर्भात राष्ट्रीय चाचणी संस्थेने 1 एप्रिलला जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेच्या अनुषंगाने एनटीएने शुक्रवारी अर्जात दुरुस्ती करण्याच्या सुविधेची व्याप्ती वाढवत यामध्ये त्यात परीक्षा केंद्राच्या शहरांच्या निवडीचा देखील समावेश केला आहे.

परीक्षा केंद्र निवडीची पुन्हा संधी

इच्छित शहरांतील क्षमतेच्या उपलब्धतेनुसार उमदेवारांना परीक्षा केंद्र देण्यात येणार असले तरी प्रशासकीय कारणास्तव अन्य शहरही दिले जाऊ शकते. ऑनलाईन अर्जाच्या नमुन्यात केंद्रासाठी शहरे निवडण्यासह तपशील दुरुस्त करण्याची सुविधा आता https://jeemain.nta.nic या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही सुविधा 14 एप्रिलपर्यंत उपलब्ध असेल. तसेच ऑनलाईन अर्जामधील तपशीलांमधील सुधारणा सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि शुल्क रात्री 11.50 पर्यंत स्वीकारले जाईल. यापुढे दुरुस्तीची कोणतीही संधी उमेदवारांना दिली जाणार नाही. अधिक माहितीसाठी उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना jeemain.nta.nic.in आणि www.nta.ac.inवर भेट देण्याच्या सूचना एनटीएकडून देण्यात आल्या आहेत.


Coronavirus : भारतीय विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या जोरावर करणार कोरोनावर मात! 
First Published on: April 10, 2020 6:41 PM
Exit mobile version