जे. जे. छत्रपती शिवाजी रुग्णालयाची ओपीडी बंद, मग आमच्यावर सक्ती का?

जे. जे. छत्रपती शिवाजी रुग्णालयाची ओपीडी बंद, मग आमच्यावर सक्ती का?

Corona Crisis: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६२४ डॉक्टरांचा मृत्यू, IMAची माहिती

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ह्रदयचिकित्सा, ईएनटी ओपीडीचे काही विभाग बंद करण्यात आले आहेत. ठाणे महापालिकेच्याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओपीडी पूर्णपणे बंद असून, रुग्णांची थेट तपासणी केली जाते. राज्य सरकार आणि महापालिकेलाही संपूर्ण क्षमतेने दवाखाना सुरू करण्यास अडचणी आहेत. अशा परिस्थितीत दवाखाने आणि छोट्या रुग्णालयांवर होणारी सक्ती अन्यायकारक आहे, असा मुद्दा ठाण्यातील डॉक्टरांनी मांडला. यासंदर्भात राजस्थानमधील भीलवाडा येथे झालेल्या घटनेकडे डॉक्टरांकडून लक्ष वेधले जात आहे. तेथील दवाखान्यात तीन डॉक्टर आणि तीन कंपाउंडर कोरोना बाधित आढळले होते. तर अन्य दहा निगेटिव्ह आढळले होते. मात्र, या संदर्भात महापालिकेच्या कारवाईच्या भीतीने कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नाही.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेच्या काही पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत ठाणे शहरातील ३० डॉक्टरांची टेलिफोन आणि व्हॉट्सअॅपद्वारे सल्ला देण्यासाठी एक समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.


हेही वाचा – CoronaVirus: छोट्या दवाखाना, नर्सिंग होममध्ये सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार?


 

First Published on: March 29, 2020 5:44 PM
Exit mobile version