भाजपच्या चौकीदार मोहीमेवर विरोधकांची टिका

भाजपच्या चौकीदार मोहीमेवर विरोधकांची टिका

‘मैं भी चौकीदार’आणि ‘चौकीदार फिर से’ हॅशटॅगवर टिका

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ‘मै भी चौकीदार’ असे ट्विटर वर नामकरण केले आहे. ‘चौकिदार फिरसे’ असा नारा देत भाजपने प्रचार मोहीम सुरु केली आहे. त्यावर विरोधकांनी भाजपच्या या नव्या प्रचार मोहीमेवर टीका करायला सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चौर है’ अशी पंतप्रधानांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाने ही प्रचार मोहीम सुरु केली आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अभिनेत्री रेणुका शाहाणेयांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे

भाजपने २०१४ सालची निवडणूक मोदींच्या नावावर लढवली. मोदींनी केवळ खोटी आश्वासने दिली असून २०१४ सालच्या ट्रिक आता चालणार नाही, ‘आप भी चोर चौकीदार, पाप के भागीदार’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर मोदीं नंतर सर्वच भाजप नेत्यांनी ट्विटरवर नावाच्या आधी चौकीदार नामकरण केल्याने चोरी पकडलल्यावर पापात सगळे भागीदार, असे म्हणत हिंदी म्हण ‘खाया पिया कूछ नही पर ग्लास फोडा चार आना’ असे ट्विट करत भाजपच्या चौकीदार अभियानावर राष्ट्रवादी कॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ मार्च रोजी ट्विटवरुन एक व्हिडिओ शेअर करत ‘मै भी चौकीदार’ अशी मोहीम सुरु करत लोकसभा प्रचाराला सुरवात केली आहे. या व्हिडिओद्वारे देशाची सेवा करणारा प्रत्येक व्यक्ती देशाचा चौकीदार आहे, असे म्हटले आहे. त्यानंतर आज त्यांनी ट्विटर वरुन चौकीदार नामकरण केले आहे.

काय म्हणाल्या रेणुका शहाणे ?

माजी केंद्रीय मंत्री एम.जे अकबर यांनी चौकीदार मोहीमेला पाठिंबा देताना आपण देखील या मोहीमेत सहभागी असल्याच ट्विट केल आहे. #metoo च्या मोहिमे अंतर्गत एम.जे अकबर यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यामुळे एम.के.अकबर यांच्यावर टिका करताना अभिनेत्री रेणुका शाहाणे यांनी आप चौकीदार है तो कोहि महिला सुरक्षित नहीं असे ट्विट केले आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नोकरी मिळत नसलेल्यांना नाईलाज म्हणून चौकदारी करावी लागत आहे. ‘देश को प्रचार मंत्री नहीं नया प्रधानमंत्री चाहिए’ असे ट्विट करत मोदींवर टिका केली आहे.

First Published on: March 17, 2019 7:08 PM
Exit mobile version