​आणखी सात स्थानकांची नावं बदलणार

​आणखी सात स्थानकांची नावं बदलणार

kingscircle stn

मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सीएसएमटी आणि एल्फिस्टन स्थानकांचं नामकरण केल्यानंतर आता या तिन्ही मार्गावरील आणखी काही ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या नावानंतर प्रस्तावित असलेल्या आणखी काही स्थानकांच्या नामांतराची मागणीही होत आहे.

या सात स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय –

पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकानंतर दादर, मुंबई सेंट्रल, सँडहर्स्ट रोड, चर्नी रोड, करी रोड, कॉटनग्रीन आणि किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे ब्रिटिश काळातील असल्याने नागरिकांसह राजकीय नेत्यांनी या स्थानकांच्या नावांना तीव्र विरोध केला आहे. यामुळे दादर स्थानकाचे नाव चैत्यभूमी, मुंबई सेंट्रल स्थानकाचे नाव जगन्नाथ नाना शंकर शेठ, सँडहर्स्ट रोड स्थानकाचे नाव डोंगरी, चर्नी रोड स्थानकाचे नाव गिरगाव, करी रोड स्थानकाचे नाव लालबाग, किंग्ज सर्कल स्थानकाचे नाव पार्श्वनाथ तर कॉटनग्रीनचे नाव घोडपेदव करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण, दादरचं नाव बदलू नये म्हणून काही जणांनी विरोधही दर्शवला आहे. ब्रिटिश काळात लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून एल्फिन्स्टन रोड हे नाव स्थानकाला देण्यात आलं होतं. पण, रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर जुलै २०१७ मध्ये नामांतराचे परिपत्रक काढण्यात आलं. त्यानंतर, आता या स्थानकाचं नाव प्रभादेवी असं करण्यात आले आहे.​

First Published on: July 21, 2018 8:56 PM
Exit mobile version