‘नाईट लाईफ सुरू करायला आमचा विरोध कायम’

‘नाईट लाईफ सुरू करायला आमचा विरोध कायम’

लेडिज बार बाबत तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी व्यक्त केलेली भिती राष्ट्रवादीच्या तरी लक्षात आली आहे. शिवसेना नेते स्व.प्रमोद नवलकर यांनी “भटक्याच्या भ्रमंतीत” रात्रीचा “स्वैराचार” जो मांडला तो आता त्यांच्या पक्षाच्या लक्षात येईल का? असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

नाईट लाईफमुळे पोलिसांवर ताण येईल, वाहतूक पोलीस,महापालिका, कामगार विभाग, फुड आणि ड्रग या विभागांना चोवीस तास काम करावे लागेल याचा विचार हा निर्णय घेण्यापुर्वी करण्यात आलेला नाही. महिला व स्थानिकांच्या सुरक्षेचे काय? तसेच निवासी, अनिवासी भाग याबाबत व्याख्या ही स्पष्ट करण्यात आलेली नाही, याकडे लक्ष वेधत भाजप नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी निवासी भागात बार, लेडिजबार, पब, हाँटेल सुरु ठेवण्यास विरोध केला होता. आज राज्याचे गृहमंत्र्यांनी नाईटलाईफ मुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार हे मान्य करीत २६ जानेवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी असमर्थता दर्शवली.

याबाबत बोलताना आशिष शेलार यांनी म्हटले आहे की आमच्या म्हणण्या प्रमाणे नाईटलाईफ मुळे पोलिसांवर येणाऱ्या ताणाबाबत कँबिनेटमधे चर्चा करु हे गृहमंत्र्यांनी मान्य केले व २६ जानेवारी पासून नाईटलाईफ अंमलबजावणी अशक्य असल्याचे जाहीर केले. लेडिजबार बाबत स्व.आर.आर. पाटील यांनी व्यक्त केलेली भिती राष्ट्रवादीच्या तरी लक्षात आलेय. तर शिवसेना नेते स्व.प्रमोद नवलकर यांनी “भटक्याच्या भ्रमंतीत” रात्रीचा “स्वैराचार” मुंबईतील भंटकंती अंती जो मांडला तो त्यांच्या पक्षाच्या ही लक्षात येईल का? असा खोचक सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच
निवासी भागात हाँटेल, बार, पब, लेडिजबार चोवीस सुरु ठेवण्यास आमचा विरोधच राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: January 19, 2020 4:43 PM
Exit mobile version