ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्यांना वेग; ‘केईएम’मध्ये आज ३ जणांना देणार लस

ऑक्सफर्ड लसीच्या चाचण्यांना वेग; ‘केईएम’मध्ये आज ३ जणांना देणार लस

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणाऱ्या लसीकडे आहे. अमेरिका, ब्रिटन या देशांमधील लसी मानवी चाचणीच्या निर्णायक टप्प्यांवर आहेत. अमेरिकेत तर नोव्हेंबरपासन लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते, असे सांगितले जात आहे. दरम्यान केईएम रुग्णालयातील कोरोनावरील ऑक्सफर्ड लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना वेग आला असून शहरातील तीन स्वयंसेवकाना ही लस शनिवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लस देण्यासाठी आतापर्यंत १३ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणाऱ्या कोविडशील्ड या लशीच्या वैद्यकीय चाचण्या मुंबईत होणार आहेत. एथिक्स समितीने परवानगी दिल्यानंतर केईएममध्ये चार स्वयंसेवकांची निवड केली असून यातील तीन जणांना शनिवारी लस टोचली जाणार आहे. आरटीपीसआर, प्रतिजन चाचण्यांमध्ये हे कोरोनाबधित नसल्याची खात्री केली आहे. नियमानुसार चौथ्या स्वयंसेवकाला प्लासीबो दिले जाणार असून शुक्रवारी आणखी १० जणांची तपासणी केली आहे. तर चाचणीसाठी स्वयंसेवकांची तपासणी सुरु केली आहे. केईएममध्ये १०० स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात येईल, असे देखील सांगितले जात आहे.

दरम्यान, सिरम इन्स्टिटयूटकडून उत्पादन करण्यात येणाऱ्या या लशीचे भारतातील नाव ‘कोविशल्ड’ आहे. शहरातील महापालिकेचे दुसरे हॉस्पिटल बी.वाय.एल. नायर हॉस्पिटललाही कोविशिल्ड लशीच्या चाचणीची परवानगी मिळाली असल्याची माहिती आहे. देशातील एकूण १७ आणि राज्यातील आठ वैद्यकीय संस्थांमध्ये कोव्हिशिल्ड लसीची चाचणी होणार आहे. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्देश आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनला महत्त्वपूर्ण यश

अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना विरोधात विकसित केलेल्या लशीच्या पहिल्या फेजच्या चाचणीचे निष्कर्ष आता समोर आले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नाहीत.

तसेच जॉन्सन अँड जॉन्सनने विकसित केलेल्या लशीचे वैशिष्टय म्हणजे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी या लशीचा एक डोसही पुरेसा आहे, तेच मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत.


मुंबईकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ महिन्यात होणार मुंबई ‘Unlock’?
First Published on: September 26, 2020 1:26 PM
Exit mobile version