परशुराम घाट आजपासून तीन दिवस बंद; कोकण- गोव्यात जाण्यासाठी ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

परशुराम घाट आजपासून तीन दिवस बंद; कोकण- गोव्यात जाण्यासाठी ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

पावसाळ्यापूर्वी घाटातील कामे उरकण्यासाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

आजपासून तीन दिवस मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोकणात मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरु आहे. या महामार्गावरील परशुराम घाटाबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या मार्गावरील चिपळूणनजीक 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत परशुराम घाट हा दिवसा वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक विभाग आणि चिपळूण महसूल विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे परशुराम घाट बंद आता 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मागच्या वर्षीच्या पावसात हा घाट धोकादायक बनला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद करणयात आला होता. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील हा घाट बंद ठेवण्यात येऊ नये, म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. घाटातील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याने किमान 7 दिवस हा घाट बंद राहणार आहे. यासाठी पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी दिली होती.

( हेही वाचा: Amrutpal Operation: पंजाब पोलिसांना मोठे यश; अमृतपालची निकटवर्तीय ‘ही’ व्यक्ती अटकेत )

‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

घाट बंद ठेवण्यात आलेल्या कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गे वळवण्यात यावी, तसे आदेश देण्याची विनंती पेण- रायगड विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आल्याचे रत्नागिरीच्या जिल्हाधिका-यांकडे 17 मार्च रोजीच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

First Published on: March 27, 2023 9:13 AM
Exit mobile version