परशुराम घाटानंतर आता पर्यायी मार्गावरही अवजड वाहनांना नो एन्ट्री, एसटी बसेसही बंद

परशुराम घाटानंतर आता पर्यायी मार्गावरही अवजड वाहनांना नो एन्ट्री, एसटी बसेसही बंद

मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात (Parshuram Ghat) दरड कोसळल्याने कोकणात जाणारा हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे विविध कामांसाठी कोकण गाठणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून लोटे चिरणी आंबडस मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली असली तरीही या मार्गावर अवजड वाहनांना नो एन्ट्री आहे. तसेच, बसेसही या मार्गावरून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. (Parashuram Ghat Closed Heavy Vehicles Will Not Run On Alternative Routes St And Private Bus Passenger Transport Is Also Closed)

हेही वाचा – ‘या’ रेल्वे मार्गावर आज दोन तासांचा इमरजन्सी ब्लॉक, पर्यायी मार्ग जाणून घ्या!

वाहतूक मार्ग बंद झाल्याने मुंबईहून चिपळूण, रत्नागिरी, दापोली, खेड येथे जाणाऱ्या एसटी सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बुधवारी एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवास निषिद्ध सांगण्यात आले आहे. तसेच, चिरणी आंबडस मार्गे केवळ हलक्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, परशुराम घाट बंद झाल्याने अवजड वाहने जिथल्या तिथे अडकून पडले आहेत. त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने पुढील काही दिवस अवजड वाहनांनी प्रवास करू नये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. तसेच, एसटी व खाजगी प्रवासी बसेसही बंद असल्याने सामान्य प्रवसी वर्गालाही मोठा फटका बसला आहे. अतिमहत्त्वाचं काम असेल तरच कोकण गाठा असे आवाहनही करण्यात येत आहे.

First Published on: July 7, 2022 1:55 PM
Exit mobile version