मेट्रो -३ प्रवासादरम्यान प्रवासी घेणार मोकळा श्वास

मेट्रो -३ प्रवासादरम्यान प्रवासी घेणार मोकळा श्वास

मेट्रो -३

मुंबईतील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता आपत्कालीन परिस्थितीत मेट्रो मार्गातील प्रवासादरम्यान अद्ययावत आणि उत्तम व्हेंटिलेशनची यंत्रणा मेट्रो -३ प्रकल्पांतर्गत वापरायला मिळणार आहे. मुंबई मेट्रो रेल विकास कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) मार्फत टप्पा-१ (टनेल व्हेंटिलेशन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणाली) यंत्रणेच्या उभारणीसाठी ‘शांघाई टनेल इंजिनीयरिंग लिमिटेड’ या समूहाची निवड करण्यात आली आहे. ही निवड आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रियेद्वारे जायकाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आली आहे.

शांघाई टनेल इंजिनीयरिंग लिमिटेड समूह मेट्रो -३ च्या आरे डेपो ते बीकेसी मेट्रो स्थानकादरम्यानच्या वायू व्हिजन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणाली यंत्रणेचे काम करणार आहे. ज्यामध्ये संपूर्ण यंत्रणेचे आरेखन, उत्पादन, पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग अशाप्रकारची कामे करणार आहेत. वायू व्हिजन यंत्रणा (टीव्हीएस) ही महत्त्वपूर्ण जीवन सुरक्षा प्रणाली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना आग आणि धूर यांसारख्या समस्येपासून संरक्षणासाठी मदतीची ठरणार आहे. भविष्यात मेट्रो स्थानकामध्ये रहदारी वाढली तरीही स्थानकामध्ये योग्य ते तापमान आणि हवा राखून ठेवण्याचे सामर्थ्य या यंत्रणेमध्ये असणार आहे. पर्यावरण नियंत्रण प्रणाली यंत्रणेद्वारे मुंबई मेट्रो -३ च्या स्थानकांमध्ये प्रवाशांना श्वसनासाठी ताजी हवा मिळणे शक्य होणार आहे, अनावश्यक वायू जसे कार्बनडाय ऑक्साइडला नियंत्रित करून मेट्रो स्थानकात वातानुकूलित वातावरण निर्माण केले जाणार आहे.

भविष्यात मुंबई मेट्रो -३ च्या स्थानकांमध्ये वायू व्हिजन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणालीमुळे प्रवाशांच्या सेवेसाठी आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. मेट्रो-३ प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ठ्या अद्यावत वायू व्हिजन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणालीची उभारणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– अश्विनी भिडे, संचालिका, एमएमआरसीएल

First Published on: February 19, 2019 4:45 AM
Exit mobile version