Video : कोरोना काळातही गोरेगावच्या नेस्को येथे गरबा झालाच; पण असा…

Video : कोरोना काळातही गोरेगावच्या नेस्को येथे गरबा झालाच; पण असा…

सध्या नवरात्रौत्सवाचा काळ सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र हा सणदेखील साजरा करण्यास सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. मात्र गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील रुग्णांनी आरोग्य सेविकांसह गरबा खेळण्याचा आनंद लुटला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला असून हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. खरतर दरवर्षी गोरेगावच्या नेस्को मैदानावर दांडियाचे आयोजन केले जाते. लोकप्रिया गायकांच्या माध्यमातून गाणी सादर करत हजारो गरबाप्रेमी इथे एकत्र जमून नृत्याचा आनंद घेतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटकाळात दांडियाच्या मोठ्या कार्यक्रमांचा बंदी घालण्यात आली आहे. तर नेस्कोच्या मैदानावर कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. तरीही येथील रुग्णांनी या जागेवर सेंटरमध्येच का होईना गरबा खेळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गोरेगावमधील नेस्को मैदानावर कित्येक वर्षापासून दांडिया आणि गरबा खेळला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस येथे मोठ्या प्रमाणात गरबाप्रेमींची गर्दी पाहायला मिळते. गरबा आणि दांडियाच्या गाण्यांवर पारंपारिक गुजराती स्टाईल गरबा येथे खेळता जातो. मुंबईतील बऱ्याच ठिकाणी गरबा मोठ्या खेळला जातो. नियमानुसार रात्री १० वाजता गरबा बंद होतो. मात्र नेस्को हे इनडोअर असल्याने येथे साधारण रात्री १ वाजेपर्यंत गरबा खेळता येतो. परंतू ही जागा सध्या कोविड सेंटरमध्ये बदलण्यात आली असून येथे मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत.

हेही वाचा –

देशात कोरोना बळावतोय! एका दिवसांत ४६ हजार ७९१ नव्या रुग्णांची वाढ

First Published on: October 20, 2020 12:10 PM
Exit mobile version