देशात कोरोना बळावतोय! एका दिवसांत ४६ हजार ७९१ नव्या रुग्णांची वाढ

India Corona Update India reports 58,419 new corona cases less than 60,000 after 81 days and 1576 deaths in last 24 hrs says Health Ministry
India Corona Update:देशात ८० दिवसानंतर आज ६० हजाराहून कमी रुग्णांची नोंद, तर १५७६ मृत्यू

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाख ९७ हजार ०६४ इतका झाला असून एका दिवसांत ४६ हजार ७९१ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ५८७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. सध्या देशामध्ये ७ लाख ४८ हजार ५३८ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत ६७ लाख ३३ हजार ३२९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ लाख १५ हजार १९७ जणांचा बळी या आजारामुळे गेला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५ हजार ९८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख १ हजार ३६५वर पोहोचली आहे. यापैकी ४२ हजार २४० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. आज राज्यातील १५ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा –

केंद्र सरकारच्या आधी राज्य सरकार काय मदत करणार ते सांगा; फडणवीसांचा हल्लाबोल