Petrol Diesel Price: दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार १११ रुपये

Petrol Diesel Price: दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना पेट्रोलसाठी मोजावे लागणार १११ रुपये

Petrol Diesel Price Drop: भाजपशासित राज्यांत पेट्रोलचे दर १२ ते १५ रुपयांनी घसरले, महाराष्ट्राचं काय?

पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत पेट्रोलच्या किंमतींचा भडका उडला आहे. मुंबईत शुक्रवारी पेट्रोलच्या किंमतीत ३५ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीतही ३५ पैशांची वाढ झाली आहे. काल मुंबईकरांना एक लीटर पेट्रोलसाठी ११० रुपये मोजावे लागत होते. आज या किंमती १११.०९ रुपयांवर पोहचल्या आहेत. तर डिझेलच्या किंमती ९३.८७ रुपयांवर गेल्या आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती जाणून घ्या.

मुंबईतील आज एक लीटर पेट्रोलसाठी १११.०९ रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक लीटर डिझेलसाठी १०१.७८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर राजधानी दिल्लीत आज एक लीटर पेट्रोलसाठी १०५.१४ रुपये तर डिझेलसाठी ९३.८७ रुपये मोजावे लागत आहेत.

मुंबई

पेट्रोल – १११.०९ रुपये प्रति लीटर
डिझेल – १०१.७८ रुपये प्रति लीटर

दिल्ली

पेट्रोल – १०५ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९३.८७ रुपये प्रति लीटर

चेन्नई

पेट्रोल – १०२.४० रुपये प्रति लीटर
डिझेल – ९८.२६ रुपये प्रति लीटर

कोलकत्ता

पेट्रोल – १०५.७६ रुपये प्रति लीटर
डिझेल – ९६.९८ रुपये प्रति लीटर

 

सप्टेंबर महिन्यापासून देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. देशातील २६ राज्यात पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,तेलंगणा,कर्नाटक तसेच मुंबई, हैद्राबाद,बंगळूरू या ठिकाणी पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे.


हेही वाचा – दिल्ली, चेन्नई दोन्ही विमाने रद्द, शिर्डीत विमान उतरलेच नाही

First Published on: October 15, 2021 11:11 AM
Exit mobile version