फोन टॅपिंग प्रकरण : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांकडून समन्स

फोन टॅपिंग प्रकरण : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांकडून समन्स

गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला यांना २८ एप्रिल रोजी मुंबई सायबर पोलिस स्टेशममध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय टेलिग्राफी अँक्ट कलम ३०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३ व ४६ तसेच ऑफिशियल सिक्रेट अँक्ट ०५ अन्वये समन्स बजावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला सध्या हैद्राबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहे. रश्मी शुक्ला सध्या राहत असलेल्या हैद्राबादच्या घरी त्यांना समन्स पाठविण्यात आले आहेत.

रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना त्यांनी राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांची परवानगी न घेताच ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन टॅपिंग केले होते. त्याचप्रमाणे सीताराम कुंटे यांनी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना स्वत: फोन टॅप करण्याची परवानगी रश्मी शुक्ला यांना दिली होती असे रश्मी शुक्ला म्हटले होते. फोन टॅपिंगचा अहवाल लीक केल्याचा आरोपही रश्मी शुक्ला यांच्यावर केला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. रश्मी शुक्ला यांचा जबाब या प्रकरणी महत्त्वाचा ठरणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता रश्मी शुक्ला चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

फोन टॅपिंगच्या लीक केलेल्या अहवालाच्या आधारे पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट सुरु असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. याप्रकरणी चौकशी करण्याची विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.


हेही वाचा – परमबीर सिंह यांच्याकडे मोठी बेहिशोबी मालमत्ता!

 

First Published on: April 27, 2021 8:43 AM
Exit mobile version