सावधान! डोंबिवलीत आढळली प्लॅस्टिकची अंडी

सावधान! डोंबिवलीत आढळली प्लॅस्टिकची अंडी

‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ असे जरी असले तरी आता अंडी खात असाल तर जरा जपून खा. कारण चिनी बनावटीच्या प्लॅस्टिकची नकली अंडी डोंबिवलीत आढळून आली आहेत. तसेच या नकली अंड्यांची डोंबिवलीत विक्री होत असल्याचा प्रकार देखील उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. दोन वर्षांपूर्वी प्लॅस्टिकची अंडी आढळून आली होती. त्यानंतर आता डोंबिवलीतील रहिवासी जितेंद्र जांभळे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

असा उघडकीस आला प्रकार

डोंबिवलीचे रहिवासी जितेंद्र जांभळे यांनी रविवारी दुकानातून आणलेल्या अंड्यात जाड थरचा प्लॅस्टिक थर आढळून आला तर फोडलेल्या अंड्याला वास सुद्धा येत नसल्याचे जांभळे यांनी सांगितले. तर काही अंड्यांना छिद्र पडली असून काही अंड्यांना छोटे छोटे फुगवटे आले असल्याचे सांगितले. त्यामुळे प्लॅस्टिकची अंडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांपूर्वी गोग्रासवाडी येथील पंचऋषी संकुलातील वसिष्ठ बिल्डिंगमध्ये राहणारे शिक्षक अमेय गोखले यांनी बनावट अंड्याचा प्रकार चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर पुन्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीकरांमध्ये खळबळ उडाली असून यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे.


हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील वनव्यासाठी विकले न्यूड फोटो; २ दिवसात कमावले ५ करोड


First Published on: January 6, 2020 5:37 PM
Exit mobile version