जोगेश्वरीत मानसिक ताणातून तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

जोगेश्वरीत मानसिक ताणातून तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

जोगेश्वरीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या देवेंद्र नरेंद्र पेंढारकर ऊर्फ मोंडू या तरुणाचे काही दिवसांपूर्वी वडिल वारले. त्यानंतर देवेंद्र एकटाच राहत होता. त्याने त्यांच्या पोटापाण्यासाठी जोगेश्वरी येथेच त्याचा वडापावचा एक छोटा धंदा सुरु केला होता. सर्व काही व्यवस्थित सुरु असताना देवेंद्रने राहत्या घरात आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. देवेंद्रच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वडिल गेल्याच्या दुख:मुळे त्याने असे टोकाचे पाऊल उचलले असेल असे सर्वांना वाटले. मात्र देवेंद्रच्या आत्महत्येप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तेजश्री भोसले, संपदा शिंदे, उमेश पोर्ट आणि जावेद इब्राहिम बेग ऊर्फ जावेद पानपट्टीवाला अशी या चौघांची नावे असून अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवेंद्र त्याचा वडापावचा छोटा धंदा चालवत होता. त्यातच त्याचे तेजश्रीसोबत वाद सुरु होता. दोन दिवसांपूर्वी तेजश्री ही तिच्या इतर सहकार्‍यासोबत त्याच्या घरी आली. त्यांनी चाकूचा धाक दाखवून देवेंद्रला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे तेजश्रीने देवेंद्रकडे 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या घटनेनंतर देवेंद्र हा प्रचंड मानसिक तणावात होता, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने घरातच आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आले. ही माहिती मिळताच मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी वंदना नरेंद्र पेंढारकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तेजश्री भोसले, सिद्धार्थ शिंदे, संपदा शिंदे, उमेश पोटे, जावेद पानपट्टीवाला व इतर दोघांविरुद्ध 452, 387, 306, 141, 142, 143, 144, 147, 149, 506 (2) आणि मपोका कलमांतर्गत गुन्हा नोंदविला गेला आहे. गुन्हा दाखल होताच तेजश्री भोसले, संपदा शिंदे, उमेश पोटे आणि जावेद बेग या चौघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या इतर सहकार्‍यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.


हेही वाचा – …म्हणून सासरच्यांनी मुलीला सून म्हणून नकारले, प्रेमी युगुलांनी आपले आयुष्यचं संपवले

First Published on: February 17, 2021 10:50 PM
Exit mobile version