मुल चोरणाऱ्या महिलेला २४ तासात पकडले

मुल चोरणाऱ्या महिलेला २४ तासात पकडले

नऊ महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण

मानखुर्द येथील ‘ईद ए मिलाद’च्या दिवशी भेंडीबाजारात मेळावा बघण्यासाठी गेलेल्या नसरीन हबीबउल्ला खान या महिलेची नजर चुकवून तिच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या मुलीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. नऊ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला २४ तासाच्या आत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या महिलेचे नविका मन्सुरी (२८) असे नाव आहे.


वाचा – व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण


नेमके काय घडले?

मानखुर्द येथे राहणारी नसरीन तिच्या तीन मुलांसह बुधवारी ईद साजरी करण्यासाठी भेंडीबाजारात गेली होती. या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नसरीन स्टेजवर आपल्या मुलांना घेऊन बसली होती. त्यावेळी तिच्या शेजारी असणाऱ्या महिलेने नसरीनची नऊ वर्षाची गुल्बसा या मुलीला खेळवण्यासाठी उचले. ते पाहून नसरीने तिच्या हातून आपल्या मुलीला काढून घेतले. मात्र त्याचवेळी नसरीनची नणंद हिला चक्कर आली असल्याने त्यावेळी नसरीनने तिच्याकडे चौकशी केली आणि त्याच दरम्यान तिच्या दुसऱ्या मुलीला तहान लागली म्हणून तिला पाणी पाजू लागली. हीच संधी साधत नविका मन्सुरी (२८) ने गुल्बसा उचलून घेऊन निघून गेली. मात्र या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने आरोपी नविका हिला शोधण्यात यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून नविका मन्सुरी हिला नळाबाजार परिसरातील राहत्या घरातून नविका मन्सुरी आणि नविकाच्या मावशीला ताब्यात घेतले आहे.


वाचा – दहशतवाद्यांकडून एका तरूणाची हत्या, दोघांचं अपहरण


First Published on: November 24, 2018 4:50 PM
Exit mobile version