घरदेश-विदेशदहशतवाद्यांकडून एका तरूणाची हत्या, दोघांचं अपहरण

दहशतवाद्यांकडून एका तरूणाची हत्या, दोघांचं अपहरण

Subscribe

जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अल्पवयीन मुलाची गळा चिरून हत्या केली आहे. ५ मुलांचं अपहरण केल्यानंतर दहशतवाद्यांन दोघांना सोडून दिलं आहे. तर दोन जण अद्यापही दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत.

जम्मू – काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत आहेत. लष्कराला लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांनी आपला मोर्चा आता नागरिकांकडे वळवला आहे. रविवारी सकाळी दहशतवाद्यांनी शोपियन जिल्ह्यातील किशोरवयीन मुलाची हत्या केली असून दोघांचं अपहरण केलं आहे. सुहैल अहमद गनाई असं या तरूणाचं नाव आहे. काश्मीरमधील एका गावातून अपहरण केलयानंतर सुहैलची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. चळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सुहैलचा मृतदेह मिळाला असून नागरिकांमध्ये सध्या दहशतवाद्यांविरोधात संतापाची वाट आहे. दहशतवाद्यांनी शोपियन जिल्ह्यातील काही गावातील ५ मुलांचं अपहरण केलं होतं. त्यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं आहे. तर अद्याप दोन जण दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, सुहैलचा दहशतवाद्यांनी निर्दयी असा खून केलेला आहे. खून करण्यात आलेल्या सुहैलचं वय केवळ १७ वर्षे होतं. त्यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व स्तरातून दहशतवाद्यांच्या हिन कृत्याचा निषेध केला जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी औरंगजेब या जवानाचं देखील अपहरण करून त्याची हत्या केली होती. शिवाय, काही पोलिस अधिकारी आणि पत्रकारांवर देखील हल्ला केला होता. पण आता दहशतवाद्यांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवला आहे. दहशतवाद्यांच्या या कृत्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असं लष्करानं स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -