‘प्रभादेवी’ नाव नक्की कोणामुळे?

‘प्रभादेवी’ नाव नक्की कोणामुळे?

प्रातिनिधिक फोटो

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनच नामकरण मध्यरात्री पासून प्रभादेवी करण्यात येणार आहे. मागील काही महिन्यांपासून पाठपूरावा केल्यानेच हे नाव बदलण्यात येत आहे. मात्र याचे श्रेय लाटायला सर्व पक्ष इच्छूक असल्याचे चित्र आहे. मागील अनेक दक्षकांपासून ‘एल्फिन्स्टन’ असलेल हे नाव आता इतिहास जमा होणार आहे. एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्याची मागणी सर्व प्रथम शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी केली होती. शेवाळे यांनी दिनांक ५/५/२०१५ रोजी लोकसभेत शून्य प्रहर मध्ये मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून ‘प्रभादेवी’ नावास अंतिम स्वरूप मिळवून घेतलं असल्याचे सांगण्यात येत आहे. तर समस्त प्रभादेवीकराच्या लढ्यामुळेच प्रभादेवी नामकरण करण्यात आले असल्याचे मनसे आणि राष्ट्रवादीचा दावा आहे.

सुमारे 300 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले प्रभादेवी मंदिर हे मुंबईतील प्रमुख देवस्थानांपैकी एक आहे. लोकमताचा आदर राखत एल्फिस्टन रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्याची मागणी मे २०१५ मध्ये मी सर्वप्रथम केली होती. आज प्रभादेवी हे नामकरण झाल्याने खऱ्या अर्थाने मुंबईकरांची मागणी पूर्ण झाली आहे असं खासदार राहुल शेवाळे सांगत असले तरीही प्रभादेवी नामकरणाचा लढा गेली साडेबारा वर्षं प्रभादेवीकर म्हणून मी लढत होतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश परब यांनी दिली. रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, सुरेश प्रभू यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याचा दावा त्यांनी केला. या लढ्याला सर्वपक्षीय पाठिंबा होता.

राहुल शेवाळे यांच्या दाव्याबद्दल मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार आक्षेप घेतला आहे. हे नामकरण समस्त प्रभादेवीकराच्या लढ्यामुळेच बदलल्या गेले असल्याचे ते म्हणाले. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश परब यांनी सागितले की,”या सरकारच्या काळात प्रभादेवी नामकरण झाल्यामुळे त्यांना धन्यवाद. प्रभादेवी रेल्वे स्टेशन नाव होणं आवश्यक होते ते झालं. राष्ट्रवादीनेही याची मागणी केली होती.”

झाल्याचे श्रेय पण रखडल्याची जवाबदारी कोण घेणार
मागील अनेक वर्षांपासून ‘एल्फिन्स्टन रोड’ चे नाव बदल्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. नाव बदल्यानंतर श्रेय घेण्यासाठी अनेक पक्ष आता पुढे सरसावत आहे. मात्र नाव बदलण्यासाठी झालेल्या दिरंगाईसाठी कोणाला जवाबदार ठरवायचे यावर कोणीही वाचा करत नाही.

First Published on: July 18, 2018 9:41 PM
Exit mobile version