pooja chavan- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

pooja chavan- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

Pooja Chavan : संजय राठोडांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाला तीन आठवड्यांहूनही अधिक काळ लोटला. मात्र अद्याप पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही. याचपार्श्वभूमीवर पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीमार्फत भक्ती राजेंद्र पांढरे यांनी लष्कर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.

टिकटॉकस्टार पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारीला मध्यरात्री पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण त्यानंतर पूजाच्या अरूण राठोड या व्यक्तीबरोबरच्या ऑडिओ क्लिप व फोटो व्हायरल झाले. त्यावरून वनमंत्री संजय राठोड यांचा या आत्महत्येशी संबध असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावरून राजकारणही तापले आहे. पण पुणे पोलिसांनी या ऑडिआो क्लिप व फोटो व्हायरल झाल्यानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे पुणे पोलीस योग्य दिशेने तपास करत नसल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. तसेच भाजपच्या अन्य नेतेही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत.

त्यानंतर आता प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. यामुळे पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीच्या माध्यमाने भक्ती राजेंद्र पांढरे यांनी अ‍ॅड. विजय ठोंबरे यांच्यातर्फे लष्कर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने सुनावणीसाठी ५ मार्च ही तारीख दिली आहे.

First Published on: February 26, 2021 6:41 PM
Exit mobile version