काँग्रेसकडे फक्त धड राहिलंय, डोकं नाही – प्रकाश आंबेडकर

काँग्रेसकडे फक्त धड राहिलंय, डोकं नाही – प्रकाश आंबेडकर

‘सध्या काँग्रेसकडे फक्त धड राहिले असून, डोके वरपासून खालपर्यंत राहिलेले नाही’, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत वंचितने आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आम्ही काँग्रेसला ४० जागांची ऑफर केली असून, त्यांनी ती स्वीकारावी, आम्ही तयार आहोत’, असे त्यांनी सांगितले. तसेच,
‘काँग्रेसकडे त्यांचे संघटन मजबूत राहिले नसल्याची देखील टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.

‘एमआयएमसोबतची आघाडी निश्चित’

दरम्यान, ‘लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील आमची एमआयएमसोबत आघाडी निश्चित झाली असून, एमआयएमने आमच्याकडे १०० जागांची मागणी केलेली नाही. तसे माझ्याकडे काही आलेले देखील नाही’, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

‘विधानसभेआधीच काँग्रेसचे सरकार असलेली राज्य जाणार’

सगळ्यात महत्वाचे म्हणजे कर्नाटकमधील चालू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाचे कर्नाटकात चालू असलेले फोडाफोडीचे राजकारण नवीन नसून, काँग्रेसने देखील असेच राजकारण याआधी केले असल्याची टिप्पणी केली. ‘भाजपा फार हळू चालले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अगोदर काँग्रेसचे राज्य असलेले तिनही सरकार पडणार’, असल्याचे ते म्हणाले.


हेही वाचा – लक्ष्मण मानेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर!

‘बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी त्यांनी निवडणुका या ईव्हीएमवर न घेता बेलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत लोकसभेच्या ४८ जागांपैकी अनेक ठिकाणी जास्त आणि काही ठिकाणी कमी मते मिळाल्याचे मतमोजणीनंतर समोर आले असल्याचा दावा केला. त्यासाठी आम्ही ३१ याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीनमध्ये हॅकिंगही नाही आणि त्यात फेरफारही करता येत नाही असे स्पष्टपणे जाहीर केले आहे. मात्र, विनिबिलिटी हा फॉर्म्युला आम्ही ठरवला आहे. ज्या जागा जिंकता येतील त्यावर उमेदवार देण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे हे का झाले? याची माहिती न्यायालयाने आयोगाकडून घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

First Published on: July 15, 2019 5:11 PM
Exit mobile version