घरमहाराष्ट्रलक्ष्मण मानेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर!

लक्ष्मण मानेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर!

Subscribe

लक्ष्मण मानेंनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं.

लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसच्या मतांचा मोठा हिस्सा स्वत:कडे वळवून काँग्रेसचे उमेदवार किमान ११ जागांवर पाडण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये दुफळी माजली आहे. आघाडीतले ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी थेट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचाच राजीनामा मागितला आहे. ‘वंचित बहुजन आघाडीमध्ये सध्या संघ आणि भाजपच्या लोकांचाच जास्त वावर आहे. त्यामुळे ही आघाडी बहुजनांची नसून उच्चवर्णीयांची झाली आहे. पण खरी ती आमची आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी तात्काळ पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’, अशी खळबळजनक मागणी लक्ष्मण मानेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली होती. त्यावर वंचित बहुजन आघाडीमध्ये वादळ उठलेललं असतानाच प्रकाश आंबेडकरांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


वाचा यावर काय म्हणाले गोपीचंद पडळकर!

वाद अपरिहार्य आहेत – प्रकाश आंबेडकर

स्वत: प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली आहे. ‘समाजातल्या अनेक घटकांना एकत्र घेऊन चालण्याचा मी प्रयत्न करत आहे. वेगवेगळे घटक एकत्र असल्यामुळे वाद अपरिहार्य आहेत. पण लक्ष्मण माने हे आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आघाडीमध्ये राहतील, असा मला विश्वास आहे’, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. त्यामुळे आता वंचितमधली ही दुफळी आघाडीमध्ये फूट पाडतेय की आघाडी एकसंध ठेवण्यात प्रकाश आंबेडकरांना यश येतंय, यावर राजकीय वर्तुळामध्ये तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

- Advertisement -

‘वंचित’ला भाजपचा पाठिंबा?

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान प्रकाश आंबेडकरांना भाजपने फूस लावली असून काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठीच त्यांनी वंचितचे ४७ उमेदवार उभे केले, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. निवडणुकांनंतर लागलेल्या निकालांवरून किमान ११ जागांवर प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या उमेदवारांना घेतलेल्या मतांमुळेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पडल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे त्या चर्चा खऱ्या ठरल्याचं चित्र निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातल्या २८८ जागा लढवण्याचा निर्धार जाहीर करणं, काँग्रेससोबत आघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीलाच फक्त ४० जागा सोडण्याची ऑफर देणं आणि त्यानंतर आता ‘उपरा’कार लक्ष्मण मानेंसारख्या आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यानंच आघाडीर आरएसएस आणि भाजपच्या लोकांचा वावर वाढल्याचा दावा करणं, यातून राज्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाला वेगळीच दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.


वाचा सविस्तर – लक्ष्मण मानेंची आंबेडकरांकडे राजीनाम्याची मागणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -