सर्वसामान्यांच्या पोटावर पाय आणणारा लॉकडाऊन नकोच, प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांना विनंती

सर्वसामान्यांच्या पोटावर पाय आणणारा लॉकडाऊन नकोच, प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांना विनंती

अॅड. प्रकाश आंबेडकर

जगात आणि देशात कोरोना संसर्गाची स्थिती भयानक अवस्थेत असली तरी आपण त्याच्यावर मात करण्याच्या तयारीने रस्त्यावर उतरत आहोत. यासह कोरोनाचा प्रादुर्भावातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी कडक निर्बंध लावणे आवश्यक असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेशी संवाद साधताना सांगितले. मात्र लॉकडाऊन हा अंतिम मार्ग नाही, असेही त्यांनी सांगितले तर दोन दिवसात यासंबंधी निर्णय घेणार असून पण परिस्थिती अशी राहिली तर लॉकडाऊन करणं अटळ राहिलं, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावणार का? अशी चिंता सर्वसामान्यांच्या मनात कायम आहे. तर काहींनी १०० टक्के लॉकडाऊनला विरोध केलाय. यासह सर्वसामान्यांच्या पोटावर पाय आणणारा लॉकडाऊन नको, अशी विनंती वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट यासंदर्भात एक ट्विट देखील केलं आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटले की, ‘लॉकडाऊन पुन्हा लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात.याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या पोटावर पाय येईल. लॉकडाऊनने कोरोना आटोक्यात येणार नाही,शिस्त पाळणे, फिजिकल अंतर पाळणे गरजेचं आहे. सरकारला आमची विनंती राहील की, लॉकडाऊन करू नये.’

…अन्यथा लॉकडाऊन अटळ

कोरोनाला रोखण्यासाठी हातात हात घालून एकत्रित लढूया, अशा गंभीर स्थितीत जनतेच्या जीवशी खेळण्याचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून केले. लॉकडाऊन हा अंतिम मार्ग नाही. दोन दिवसात यासंबंधी नेते, तज्ज्ञ, डॉक्टर, पत्रकारांशी चर्चा करून मार्ग काढू. पण परिस्थिती अशी राहिली तर जगाने जे स्वीकारले तो लॉकडाऊन आपल्याला स्वीकारावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मार्च महिन्यात कोविडने जगात शिरकाव केल्यापासून आपली सारी यंत्रणा कामाला लागली आहे. त्याला रोखण्यात आपण यशस्वी ठरलो. हे युध्द एकत्रित लढलो म्हणून आपल्याला यश आले. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक नेते आणि सामान्य नागरिकांच्या सहकार्यामुळे संकट टळले. पण पुन्हा निर्धास्त राहिल्याने संकटाने मान वर काढली, असेही त्यांनी सांगितले.


लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध; टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय

First Published on: April 3, 2021 9:18 AM
Exit mobile version