…तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व देण्यास तयार – आठवले

…तर प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्व देण्यास तयार – आठवले

रामदास आठवले

भविष्यात रिपब्लिकन पक्षाचे विविध गट एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्व देण्याची तयारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दर्शवली आहे. वेगवेगळे राहून राजकीय फायदा होत नाही, एकत्र येणे हीच काळाची गरज आहे. रिपब्लिकन पक्ष एकत्रित येत असतील तर माझी मंत्रिपद सोडण्याचीही तयारी असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. आंबेडकरी समाजाला एकत्र यावे असे वाटत असेल तर समाजाने नेत्यांवर दबाव आणावा.

वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही. माझा 1996 चा तिसर्‍या आघाडीचा अनुभव आहे. प्रकाश आंबेडकर यांनी हातमिळवणी केली तर पुढल्या पाच वर्षातील राजकीय भूमिका ठरवू अशी ऑफरही आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली.अनुसूचित जाती-जमातीच्या हितासाठी ज्यांच्याकडून राजकीय लाभ मिळेल त्यांच्यासोबत मी आणि प्रकाश आंबेडकर जाऊ अशी माझी भूमिका आहे.

मात्र प्रकाश आंबेडकरांनी आधी एकत्र यावे. निर्णय घेताना बहुमताने, एकमताने निर्णय घेऊ. दलित समाजातील विचारवंतांनी यासाठी प्रयत्न आणि मार्गदर्शन करावे, असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले.

First Published on: April 15, 2019 4:52 AM
Exit mobile version