पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील ICAR च्या लॅबचे उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील ICAR च्या लॅबचे उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार, २७ जुलै २०२० रोजी तीन राज्यांमध्ये इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICAR) लॅबचे उद्घाटन होणार आहे. दिल्लीतील नोएडा, पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी हे ICAR चे लॅब असणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान हे उद्धाटन करणार आहेत. यावेळी त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री व्हर्च्युव्हल इव्हेंटमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हर्च्युव्हल इव्हेंटमध्ये असणार आहेत.

देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा १३ लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ६३.४५ टक्के इतका आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित संख्या महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यात आहे. आज रात्रीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १३ लाखांच्या पुढे गेली आहे. कोविड-१९ इंडिया.डॉट कॉम (covid19india.org)च्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात १३ लाख १५ हजार ७२७ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी ३० हजार ९६१ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८ लाख ३४ हजार ६६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख ४९ हजार ६८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा रेट ६३. ४५ टक्के इतका आहे.

हेही वाचा –

India Population : लोकसंख्येत घट; २१०० सालापर्यंत होणार १०० कोटी

First Published on: July 24, 2020 10:45 PM
Exit mobile version