घरदेश-विदेशIndia Population : लोकसंख्येत घट; २१०० सालापर्यंत होणार १०० कोटी

India Population : लोकसंख्येत घट; २१०० सालापर्यंत होणार १०० कोटी

Subscribe

साधारण ८० वर्षानंतर भारताची लोकसंख्या कमी होऊन १०० कोटी इतकी होणार आहे. (fertility rate) प्रजनन क्षमतेत घट होऊन लोकसंख्या कमी होणार असल्याचा निष्कर्ष संयुक्त राष्ट्र लोकसंख्या डिव्हिजन यांनी काढला आहे. जागतिक लोकसंख्येतही २ अरब इतकी घट होणार असल्याचा अंदाज त्यांन वर्तवला आहे. असे मेडिकल जर्नल दि लँसेटमध्ये प्रकाशित वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतील अभ्यासात सांगण्यात आले आहे. गेल्या ७० वर्षात भारतामध्ये प्रजनन क्षमतेत कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. १९५० साली प्रजनन क्षमतेत ५.६ इतकी होती. म्हणजे एका महिलेल्या मागे ५.६ मुले होत. तर २०१७ साली ही संख्या कमी होऊन २.१४ इतकी झाली आहे. या अभ्यासानुसार असा अंदाज लावला जात आहे की भारतात २१०० पर्यंत एकूण प्रजनन क्षमतेत कमी होऊन १.२९ इतकी होईल. तर जगाचा अंत होईपर्यंत भारताची लोकसंख्य ३० कोटीपर्यंत कमी होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

या अहवालानुसार भारतातील प्रजनन क्षमतेत घट येत राहणार असून २१०० पर्यंत ती १.२९ पर्यंत येणार आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या इंस्टिट्युट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशनच्या शोधकर्त्यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जागतिक स्तरावरही प्रजनन क्षमतेत घट होणार आहे. २०१७ मध्ये ती २.४ होती, तर २१०० पर्यंत ती १.७ इतकी होणार आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७.८ अरब इतकी आहे. २०६४ मध्ये ती ९.७ पर्यंत पोहोचेल. त्यानंतर जगाची लोकसंख्या कमीकमी होत जाईल. जगाच्या अंतापर्यंत ती ८.८ अरब इतकी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

लॉकडाऊनमध्ये Breakup झालाय तर ‘हे’ नक्की वाचा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -