आर्थर रोड तुरुंगात जेलरकडून कैद्यांना मारहाण

आर्थर रोड तुरुंगात जेलरकडून कैद्यांना मारहाण

आर्थर रोड मोहम्मद शाहिद खान, इरफान अहमद शेख, मोहम्मद रईसूद्दन, नासीर अबू बकर हे अंडर ट्रायल आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. जेलर हर्षद अहिरराव त्यांना वारंवार मारहाण करतो. त्यामुळे या कैद्यांना वेगळ्या तुरुंगात हलवा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी लक्षवेधी मागणीच्या चर्चेदरम्यान केली. यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री रणजीत पाटील म्हणाले की, तुरुंग बदलून पाहिजे असतात त्यामुळे हार्डकोअर कैदी असा कांगावा करतात. तरीही यातील सत्यता तपासून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

अबु आझमी म्हणाले की, १ फेब्रुवारी रोजी मी यासंबंधीचे पत्र दिले होते. मात्र त्यानंतरही १० जूनला हर्षद अहिरराव यांनी पुन्हा या चार कैद्यांना मारहाण केली. या कैद्यांनी हायकोर्टातून तुरुंग बदलून देण्यात यावे, अशी ऑर्डर आणली होती. तरिही त्यांना तुरुंग बदलून देण्यात आलेले नाही.

आर्थर रोड तुरुंगात एका जागी ६५ कैदी ठेवण्याची जागा लिहिले असताना तेथे २०० कैदी डांबले आहेत. आता नीरव मोदी आणि इतर आर्थिक घोटाळा केलेल्या गुन्हेगारांना भारतात आणले जाणार आहे, मग त्यांनाही याच जागेत डांबणार का? असा प्रश्न देखील अबू आझमी यांनी या चर्चेदरम्यान विचारला.

First Published on: June 28, 2019 3:01 PM
Exit mobile version