मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी खटला सुरू

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी खटला सुरू

मंजुळा शेट्ये

भायखळा तुरुंगातील महिला कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूप्रकरणी तुरुंगातील सहा महिला कर्मचाऱ्यांविरोधात खटला गुरूवारी सुरु करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी तपासादरम्यान भायखळा तुरुंगाचा नकाशा तयार करणाऱ्या पहिल्या साक्षीदाराची साक्ष पहिल्या साक्षीदाराची साथ विशेष सरकारी वकील विद्या कासले यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्यासमोर नोंदवली. मंजुळा या एका गुन्ह्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होत्या. त्यांच्या चांगल्या वर्तवणूकीमुळे त्यांची शिक्षा कमी करण्यात आली होती. दोन अंडी व पाच ब्रेडच्या वाटपाच्या मुद्द्यावरून महिला कर्मचाऱ्यांनी मंजुळाला मारहाण केली होती. अत्यंत गंभीर जखमा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी शेट्ये यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान २३ जून २०१७ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तुरुंग अधिकारी मनिषा पोखरकर, तसेच कॉन्स्टेबल बिंदू नायकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे व आरती शिंगणे यांच्याविरूद्ध सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. गुरूवारी साक्ष नोंदवण्यात आलेल्या साक्षीदाराने भायखळा महिला तुरुंगाचा आराखडा न्यायालयात समजावून सांगितला. त्यानंतर साक्षीदाराची उलट तपासणी करण्याच्या दृष्टीने तुरुंगाला भेट देण्याची अनुमती द्यावी अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. तेव्हा या संदर्भात बचावर पक्षाने तुरुंग अधीक्षकांकडे परवानगी मागावी, असे निर्देश देऊन पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला ठेवली आहे.

 

First Published on: November 16, 2018 10:25 AM
Exit mobile version