CoronaVirus: नायर हॉस्पिटलमधील ११ परिचारिकांना केले क्वारंटाईन

CoronaVirus: नायर हॉस्पिटलमधील ११ परिचारिकांना केले क्वारंटाईन

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयाचा ठेकेदार बदला सामाजिक कार्यकर्ते अजय सावंत यांची मागणी

मुंबईत कोरोना प्रसाराचा वेग लक्षात येत असतानाच सोमवारी नायर हॉस्पिटलमधील ११ परिचारिकांना क्वारंटाईन करावे ‌लागल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. तर केईएम हॉस्पिटलमध्ये झालेल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूमुळे दोन परिचारिकांनाही क्वारंटाईन केल्याचे समजत‌ आहे. या सर्व परिस्थितीत मुंबईतील पालिका आणि सरकारी हॉस्पिटलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण संबंधित हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असून कर्मचाऱ्यांना या किटची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ही जीव धोक्यात आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. पण ज्या दिवशी या महिलेचा मृत्यू झाला त्या दिवशी तिच्या मृतदेहाजवळ बरेचसे नातेवाईक फिरत होते. शिवाय ज्या डॉक्टरांनी त्या महिलेचे उपचार केले होते. त्यांनाही ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे माहित नव्हते. त्यामुळे मृतदेहाला कोणत्याही सुरक्षेशिवाय हात कसा लावायचा आणि तो मृतदेह नातेवाईकांना कसा सुपूर्द करायचा असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. त्यानंतर केईएम हॉस्पिटलमध्येही एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या दोन परिचारिकांना क्वारंटाईन करावे लागले असल्याची माहिती देण्यात आली.

नायरच्या ११ परिचारिका क्वारंटाईन

काही दिवसांपूर्वी नायर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते.‌ सोमवारी हा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे‌ समजले. यामुळे रुग्णालयात गोंधळ‌ उडाला. या रुग्णाच्या संपर्कात‌ आलेल्या परिचारिकांकडे चौकशी करण्यात आली. यात एक परिसेविका आणि १० परिचारिका अशा ११ जणी संपर्कात असल्याचे समजले. या ११ जणींना त्वरीत क्वारंटाईन करण्यात आले.‌ पण यावरून सार्वजनिक हॉस्पिटलमधील हेल्थ केअर कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे म्युनिसिपल‌ नर्सिंग अँण्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या त्रिशाला कांबळे यांनी सांगितले.

तर, विक्रोळी येथील परिचारिकेलाही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रसाराची चिघळणारी स्थिती पाहता हेल्थ केअर कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट्स मिळावेत यासाठी कर्मचारी संघटनाही पुढे सरसावत आहेत.

हेही वाचा –

Corona Crisis: कोरोनामुळे १२ हजार ऑर्केस्ट्रा कलाकारांवर उपासमारीची वेळ

First Published on: March 31, 2020 9:33 PM
Exit mobile version