Coronavirus: आता जीवनावश्यक वस्तूसाठी रेल्वे धावणार

Coronavirus: आता जीवनावश्यक वस्तूसाठी रेल्वे धावणार

मालगाडी

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादींसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये यासाठी मध्य रेल्वेने पुढाकर घेतला आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेकडून लहान आकारातील पार्सल गाड्या चालवण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुडवाडा पडणार नाही.

पॉईंट टू पॉईंट ही वाहतूक सेवा

संपूर्ण जगात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. तसेच मुंबईसह राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा १६० वर पोहोचला असून करोनाचा आजार बळावू नये म्हणून विविध पातळ्यांवर राज्य आणि केंद्र सरकार खबरदारी घेत आहेत. या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्या पाठोपाठ २२ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानेदेखील रद्द करण्यात आली. त्यानंतर २४ मार्चला मध्यरात्रीपासून आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आली. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान लहान पार्सल आकारातील वैद्यकीय साहित्य, वैद्यकीय उपकरणे, अन्न इत्यादीसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद पडली होती. मात्र आता मध्य रेल्वेने ती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – बघा! करोनाला रोखणारे पोलीस कसा करतायंत प्रवास

या मार्गावर धावणार गाड्या 

काही प्रमाणात या अडचणी दूर करण्यासाठी मध्य रेल्वे पुढे आली आहे. वैद्यकीय पुरवठा, उपकरणे आणि भोजन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी ती खुली केली आहे. इच्छुक पार्टीला आवश्यक नोंदणी करण्यासाठी पार्सल कार्यालये आणि विभागीय कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. मर्यादीत नियमांनुसार पार्सल गाड्यांद्वारे पॉईंट टू पॉईंट ही वाहतूक सेवा उपलब्ध असणार आहे. या पार्सल गाड्या कल्याण ते नवी दिल्ली, नाशिक ते नवी दिल्ली, कल्याण ते संतरागाची आणि कल्याण ते गुवाहाटी दरम्यान धावणार आहेत.

First Published on: March 28, 2020 8:25 PM
Exit mobile version