मुंबई लोकलच्या गर्दी व्यवस्थापनाबाबत लवकरच बैठक, रावसाहेब दानवेंचा CSMT ते दादर लोकल प्रवास

मुंबई लोकलच्या गर्दी व्यवस्थापनाबाबत लवकरच बैठक, रावसाहेब दानवेंचा CSMT ते दादर लोकल प्रवास

रावसाहेब दानवेंचा दोन दिवसीय मुंबई दौरा

रेल्वे राज्यमंत्री दानवे हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून ते IRSDC अंतर्गत प्लॅटफॉर्म विकासकामांची पाहणी करणार आहेत. या पाहणी दौऱ्यावर असताना रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकलने प्रवास केल्याचे समोर आले. यावेळी त्यांनी मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. दरम्यान, मुंबई लोकलच्या गर्दीच्या नियोजनासंदर्भात लवकरच महत्त्वाची बैठक देखील रावसाहेब दानवे घेणार आहेत. रेल्वेच्या मुंबईच्या कारभारासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. देशातील ६८ रेल्वे स्थानकं PPP मोड्यूल अंतर्गत विकास करणार आहे. यामध्ये मुंबईकडे लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. मुंबईकरांची लाईफलाईन मुंबईची लोकल असल्यामुळे जास्तीत जास्त सुविधा मुंबईकरांना कशा होतील, याचा प्राधान्याने विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी एक्सप्रेसला हिरवा कंदिल

रावसाहेब दानवे आज दादर स्थानकांतून सुटणाऱ्या मोदी एक्सप्रेसला हिरवा कंदिल दाखवण्यासाठी दादरला उपस्थितीत होते. दादर स्थानकावर पोहोचण्यासाठी त्यांनी CSMT ते दादर असा मुंबई लोकलने प्रवास केला. ही एक्सप्रेस कोकणवासियांसाठी सोडली जाणार आहे. एकूण १८०० प्रवासी या एक्सप्रेसमधून प्रवास करू शकणार आहेत. यावेळी भाजपाचे सर्व नेते, पदाधिकारी यावेळी हजर होते. गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या १८०० प्रवाशांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाकडे रवाना झाली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. दादर स्थानकावरुन ही ट्रेन सावंतवाडीच्या दिशेने रवाना करण्यात आली. यावेळी ट्रेनमधील प्रवाशांनी बाप्पाची आरती म्हणत या प्रवासाला सुरूवात केल्याचे पाहायला मिळाले. मोदीजींच्या संकल्पनेतून २२५ ट्रेन आम्ही कोकणवासीयांसाठी सोडल्या आहेत. महाराष्ट्रात गणपती उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. आता ही रेल्वे कोकणात जाणार आहेत. या रेल्वेमुळे कोकणवासी खूश आहेत, असे यावेळी दानवेंनी सांगितले.


 

First Published on: September 7, 2021 11:59 AM
Exit mobile version