रायते पुलाला जोडणारा रस्ता खचला; कल्याण – नगर महामर्गावरील वाहतूक बंद

रायते पुलाला जोडणारा रस्ता खचला; कल्याण – नगर महामर्गावरील वाहतूक बंद

कल्याण - मुरबाड मार्गावरील रायते पुलाला जोडणारा रस्ता खचला

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण मुरबाड मार्गावर रायते पुलाला जोडणारा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. कल्याणनगर महामार्गावरील रायते पुलाला जोडणारा रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. रायता पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. रायते पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा (पांजरपोळ दिशेकडील) भलामोठा भाग पाण्यात वाहून गेल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पर्यायी रस्ता

कल्याणहून आळेफाटा अहमदनगरकडे जाण्यासाठी शहाड टिटवाळा गोवेली मार्गे मुरबाड असा पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा एसटी वाहनाने कल्याण पडघा, शहापूर, सरळगावमार्गे अहमदनगर असा प्रवास करावा

एसटी मार्ग

मुरबाड येथे जाण्यासाठी कल्याण बारवी डॕम मार्गाने प्रवास करावा


हेही वाचा – मध्य रेल्वेसह हार्बरवरील मेगा ब्लॉक रद्द; पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक कायम


 

First Published on: July 28, 2019 1:48 PM
Exit mobile version