घरमुंबईमध्य रेल्वेसह हार्बरवरील मेगा ब्लॉक रद्द; पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक कायम

मध्य रेल्वेसह हार्बरवरील मेगा ब्लॉक रद्द; पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक कायम

Subscribe

मध्य रेल्वे, हार्बरवरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

रेल्वे रुळाची देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी तीनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार होता. परंतु मुसळधार पावसाने ठाणे परिसरात पावसाने कहर केल्यानंतर, तसेच आज हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवरील तसेच हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक आज रद्द करण्यात आल्याचे ट्विट रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बरवरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. परंतु, पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉक कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे रविवारीच्या दिवशी हाल होणार आहेत.

- Advertisement -

विविध तांत्रिक कामांसाठी आज रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यत येणार होता. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवरील सीएसएमटी ते चुन्नाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, मध्य रेल्वेने हा आजचा मेगा ब्लॉक रद्द झाल्याचे ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहेच. तर पश्चिम रेल्वेच्या भाईंदर ते वसई रोड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर बॉल्क कायम राहणार आहे.

पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक

  • कुठे – भाईंदर ते वसई रोडदरम्यान अप व डाऊन जलद मार्ग
  • वेळ – सकाळी ११.०० ते दुपारी ३.००
  • परिणाम – ब्लॉकमुळे अप जलद रेल्वे विरार, वसई रोड ते भाईंदर, बोरिवलीदरम्यान अप धिम्या मार्गावर, तर डाऊन जलद गाडय़ा बोरिवली ते वसई रोड, विरारदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर धावतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -