राज ठाकरे ‘महाराष्ट्र धर्मसम्राट’; मनसेची पोस्टरबाजी

राज ठाकरे ‘महाराष्ट्र धर्मसम्राट’; मनसेची पोस्टरबाजी

मनेसेचे महाअधिवेशन येत्या २३ जानेवारीला मुंबई येथील गोरेगाव संकुलात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी दिशा जाहीर करणार का? अशी जोरदार चर्चा रंगली असतानाच राज ठाकरे यांना ‘महाराष्ट्र धर्मसम्राट’, असे संबोधण्यात आले आहे. शिवसेना भवनसमोर राज ठाकरेंचे पोस्टर लावण्यात आले आहे. सतेच ‘सत्तेसाठी सतराशे साठ, मात्र महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’, असा या पोस्टरवरचा मजकूर आहे. अचानक लावण्यात आलेले पोस्टरबाजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मनेसेच्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी

मनेसेचे महाअधिवेशनाला काही दिवसच राहिले असून या पार्श्वभूमीवर मनसेकडून अधिवेशनासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. हे महाअधिवेशन सुरळीत पार पडावे, यासाठी मनसेकडून विशेष काळजी देखील घेतली जात आहे. या महाअधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला बारकोड असलेले ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ला मिळाली आहे. यासाठी महाअधिवेशनाला येणाऱ्यांची यादी देण्यात यावी, असे आदेश सर्व विभाग अध्यक्षांना देण्यात आले आहेत. या यादीनुसारच ओळखपत्रं बनवण्यात येणार असून, त्यावर विशेष बोरकोड लावण्यात येणार आहे.

मुंबईच्या पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी

मनसेच्या या महाअधिवेशनाला ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी मुंबईतील विभाग अध्यक्ष, तसेच मनसेच्या मुंबईतील इतर पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या अधिवेशनाला मनसेच्या सर्व नेत्यांसह शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, गटनेते, उपविभाग अध्यक्ष, सरचिटणीस तसेच मनसेचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


हेही वाचा – ‘तेजस’मधल्या गुजराती वेशभूषेवर मनसेचा आक्षेप!


 

First Published on: January 17, 2020 9:44 AM
Exit mobile version